मुंबई : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सनी देओल गेल्या काही दिवसांपासून कुल्लूमध्ये राहत होते. कुल्लूचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सनी देओल आणि त्याचे मित्र मुंबईला जाण्यासाठी नियोजन करत असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
सनी देओल यांच्यावर मुंबईत काही दिवसांपूर्वी खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ते आपल्या मनातील कुल्लूमधील फार्महाऊसवर राहायला गेले होते.
दरम्यान, गुजरातचे भाजपचे राज्यसभेचे खासदार अभय भारद्वाज यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. भाजप खासदार भारद्वाज यांचं मंगळवारी चेन्नईमध्ये निधन झालं. कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्याची प्रकृती अधिक खालवली होती. भारद्वाज यांच्या कुटुंबाची कोरोना चाचणी देखील पॉझिटीव्ह आली आहे. त्यांच्या कुटुंबियांनवर देखील उपचार सुरू आहेत. भारद्वाज यांच्या अचानक जाण्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. अभय भारद्वाज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या –
पुजारीही अर्धनग्न अवस्थेत असतात मग् त्यांनाही मंदिरात प्रवेश नाकारणार का?
‘मिळाली सत्ता घ्या गपगुमान ही काँग्रेसची अवस्था’
पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची पण गरज नाही पडणार – खडसे
कंगनाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही – उर्मिला मातोंडकर
धनंजय मुंडे म्हणाले विजय आमचाचं; प्रीतम मुंडे म्हणतात गुलाल आमचाचं!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

