लखनऊ :- देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपा खासदाराच्या मुलावर गोळीबार करण्यात आला असून चौकशीत धक्कादायक सत्य पुढे आलं आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये बुधवारी पहाटे भाजप खासदार कौशल किशोर आणि आमदार जय देवी यांच्या मुलावर अर्थात आयुष किशोर याच्यावर दोन बाईकस्वारांनी गोळीबार केल्याची घटना घडली असल्याचे सांगण्यात येत होते परंतु, पोलीस तपासात या घटनेमागचं सत्य समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसलाय.
या प्रकरणात पोलिसांनी आयुष याचा मेव्हणा (बायकोचा भाऊ) आदर्श याला अटक केली होती. पोलिसी दंडुक्या पडल्यानंतर आदर्शनं सगळा प्रकार पोलिसांसमोर मांडला.आयुष यानं स्वत:च आपल्यावर गोळीबार करवून घेतला होता. या गोळीबाराच्या प्रकरणात पाच – सहा जणांना अडकवण्यासाठी त्यानं हा कट आपल्याकरवी रचून घेतला होता, असं आदर्शनं पोलिसांना सांगितलंय.
चंदन गुप्ता, मनिष जयस्वाल आणि प्रदीप कुमार सिंह यांच्यासोबत आणखी दोन जण होते परंतु, त्यांची नावं मला माहीत नाहीत. आयुषच्या सांगण्यावरून मी केवळ समोरून गोळी झाडली होती, अशी कबुली आदर्शनं दिलीय.
दरम्यान, मेहुण्याच्या अटकेची बातमी समजताच खासदारांचा मुलगा रुग्णालयातून डिस्चार्ज घेवून फरार झाला. त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी खासदार कौशल किशोर यांचा मुलगा आयुष आणि त्याचा मेव्हणा यांच्याविरूद्ध मादियानव पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तेरणा, तुळजाभवानी’साठी संसदेमार्फत प्रयत्न करू, शरद पवारांचे आश्वासन
- खळबळ! मनसेमुळे जमीन बळकावणाऱ्या बीडमधील ‘प्रतिष्ठितां’वर गुन्हा
- आ.पवारांचे उपोषण मागे, महसूलमंत्री विधानभवनातच घेणार बैठक
- पंतप्रधानांना स्पीड पोस्टने पाठवल्या गोवऱ्या; गॅस दरवाढीचा निषेध
- औरंगाबाद मनपा भुंखडाचा वाद विधानसभेत; नगरविकास मंत्री शिंदे यांचा तथ्य नसल्याचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

