Share

आ.पवारांचे उपोषण मागे, महसूलमंत्री विधानभवनातच घेणार बैठक

Published On: 

बीड : गेवराई मतदारसंघातील गोदावरी व सिंदफना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. याप्रकरणी भाजप आ.लक्ष्मण पवार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरच उपोषण सुरू केले होते. याची दखल घेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपोषण मागे घेण्यात आले.

अवैध वाळू उपशामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमानावर बुडत आहे. शिवाय अवजड वाहनाने वाळू वाहतूक केल्यानेरस्त्यांची देखील दुरवस्था होत आहे. सुसाट वेगाने वाहणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांच्या जीवितास देखील धोका निर्माण होतो. या सर्व बाबतीत तहसीलदार, जिल्हाधिकारी व सचिवांपर्यंत वेळोवेळी मागणी करून निर्णय न झाल्यामुळे आमदार लक्ष्मण पवार यांनी शेवटी काही मागण्या ठेवून विधानभवणातच दि.२ मार्च रोजी आमरण उपोषण सुरू केले.

यावेळी टेंडर काढताना वाळुची अपसेट किमंत कमी करावी, वाळु वाहतूक टिपर व हायवा ऐवजी फक्त ट्रॅक्टरनेच करावी, वाळु वहातूकीमुळे खराब झालेले रस्ते तात्काळ दुरूस्त करून द्यावेत, गोरगरिबांना घरकुलासाठी मोफत वाळु द्यावी, या अत्यंत संवेदनशील विषयाची दखल घेऊन विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद फडणीस यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

महसुल मंत्री बाळासाहेब थोरात काही कारणामुळे मुंबईत नसल्यामुळे त्यांच्याशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क केला व त्यांना उपोषणाबाबत माहिती दिली. थोरात यांनी विधान भवनात दोन्ही आमदारांच्या उपस्थित तात्काळ बैठक लावून सर्व मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यामुळे फडणीस यांच्या उपस्थित आ.लक्ष्मण पवार व व राजेश पवार यांनी उपोषण मागे घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!