Share

‘मिशन मुंबई’ मध्ये महाविकास आघाडी विरोधात भाजप-मनसे एकत्र येणार ? दरेकर म्हणतात…

Published On: 

पुणे : मुंबई भाजपच्या विद्यमान कार्यकारिणीच्या कार्यकाळातच मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल, असा विश्वास व्यक्त करत भ्रष्टाचाराचे आगार असलेली मुंबई महापालिकेची सत्ता २०२२ मध्ये उलथवून लावायची, असे निर्देश भाजपाचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या माध्यमातून फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने बिहारनंतर आता ‘मिशन मुंबई’ सुरू केले आहे.

२०२२ च्या महापालिका निवडणुकांमध्ये जुने मित्र शिवसेना आणि भाजप आमने-सामने असणार आहेत. सद्या या महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून अजून लांब असलेल्या महापालिका निवडणुकांतून मुंबईची सत्ता कोणाच्या हाती जाणार हा प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने भाजपने आतापासून आपली मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे राज्य सरकारमधील महाविकास आघाडी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये कायम ठेवणार का? यावरून जरी अजून कोणताही खुलासा करण्यात आला नसला तरी भाजप महाविकास आघाडीला रोखण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेला साद घालणार का?, यावरून उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोरोना काळात अनेक अडचणी घेऊन सामान्यांसह अन्य क्षेत्रातील दिग्गज देखील थेट राज ठाकरेंच्या दरबारी गेल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंची असलेली राजकीय ताकद आणखी वाढली असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

तर, आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. ‘भाजप स्वबळावर लढण्यास तयार आहे’ असं सांगतानाच संभाव्य भाजप-मनसे युतीवर सावध प्रतिक्रिया देखील देत म्हणाले, ‘निवडणूक आल्यावर पक्ष यासंदर्भात योग्य भूमिका घेईल.’ त्यामुळे येत्या काळात भाजप-मनसे एकत्र आल्यास ही निवडणूक वेगळं वळण घेऊ शकते अशी शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!