🕒 1 min read
मुंबई : आज महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी मतदान होत आहे. आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडी या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आता मोठा दावा केला आहे.
काल महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना भाजपचे (BJP) आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला. तसेच महाविकास आघाडीच्या आमदारांना निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे. उद्याच्या निवडणुकीत सर्व उमेदवार निवडून येतील हा आमचा प्रयत्न आहे. मित्र पक्षांना काय मदत करता येईल हे आम्ही पाहत आहे, असंही ते म्हणाले.
तसेच पत्रकारांनी यावेळी पाटील यांना प्रश्न विचारला.भाजपचे ९ की १३ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत? यावर पाटील यांनी उत्तर दिले. भाजपचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. यावर आता बोलण जास्त गरजेचे ठरणार नाही. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर यावरून पडदा हटणार आहे. अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
