🕒 1 min read
मुंबई: आज विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी तर भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड उभे राहिले आहेत. राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप उभे राहिले आहेत. आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (rohit pawar) विधानभवनात आले असता त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत टोला लगावला.
“आम्हाला विश्वास आहे मात्र आमच्या विरोधात असणाऱ्या पक्षाला अतीआत्मविश्वसा आहे. तरी आमचे सहाच्या सहा उमेदवार निवडून येतील. तसेच राज्यसभेने आम्हाला बरच शिकवलय. विरोधी पक्ष कुठल्याही स्थराला जाऊ शकतो. कुठल्या आमदारावर दबाव आणू शकतो. आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत हे बघितले.”,असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
या निवडणुकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काळजी घेतलेली आहे. तसेच आम्ही महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बाजूने आहोत. गेल्या वेळेस एक मत बाद झालं तर सगळं समिकरण बदललं. या वेळेस प्रत्येक मताची काळजी आम्ही सर्वांनी घेतली असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राष्ट्रवादीला धडा शिकवण्याची शिवसेनेकडे संधी, ‘सोने’ कराल – भाजप आमदार राम सातपुते
- Legislative council election : “भाजपाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात पण…” ; एकनाथ खडसेंचे सुचक वक्तव्य
- विधानपरिषद निवडणूक : राज्यसभेला केलेली चूक आम्ही यावेळी करणार नाही; रोहित पवारांनी व्यक्त केला विश्वास
- ….तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – रामदास आठवले
- प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांचा साई पल्लवीला पाठिंबा, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
