🕒 1 min read
मुंबई: आज विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १२ पर्यंत एकूण २०३ मतदान झाले आहे. दरम्यान यावरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.
“ज्यांचा काही दिवसांपासून गर्व वाढला आहे, त्यांचा गर्व हरण होण्याचा आजचा दिवस आहे. आजच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार बहुमताने निवडून येतील.”, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीच्या सर्व मतांचे समीकरण झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मविआचाच विजय होणार असे पटोले यांनी म्हटले.

दरम्यान या निवडणुकीत शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी तर भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड उभे राहिले आहेत. राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप उभे राहिले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- मिताली राज! नाम तो सुना होगा! Shabaash Mithu चा दमदार ट्रेलर रिलीज
- “आमच्या विरोधात असणाऱ्या पक्षाला अतीआत्मविश्वस…”, रोहित पवारांचा फडणवीसांना टोला
- राष्ट्रवादीला धडा शिकवण्याची शिवसेनेकडे संधी, ‘सोने’ कराल – भाजप आमदार राम सातपुते
- Legislative council election : “भाजपाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात पण…” ; एकनाथ खडसेंचे सुचक वक्तव्य
- विधानपरिषद निवडणूक : राज्यसभेला केलेली चूक आम्ही यावेळी करणार नाही; रोहित पवारांनी व्यक्त केला विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
