Share

मिताली राज! नाम तो सुना होगा! Shabaash Mithu चा दमदार ट्रेलर रिलीज

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘शाबाश मिठू’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये तापसी पन्नू भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजची भूमिका साकारताना दिसत आहे. ‘शाबाश मिठू’च्या ट्रेलरमध्ये मिताली क्रिकेट खेळण्यात उत्तम असल्याचे दाखवण्यात आले आहे. यामध्ये तिचे प्रशिक्षक तिच्या पालकांना सांगतात की तिला योग्य प्रशिक्षण दिल्यास ती राष्ट्रीय खेळू शकते. हा चित्रपट १५ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे. तापसी पन्नूने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून ‘शाबाश मिठू’च्या ट्रेलर रिलीजची तारीख सांगितली आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेटची सर्वोत्तम महिला फलंदाज मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यावर तापसी पन्नूने मितालीचे तिच्या योगदानाबद्दल आभार मानले. तापसीने लिहिले की, “धन्यवाद हा एकमेव शब्द आहे जो आपण सर्व म्हणू शकतो.” क्रिकेटप्रेमींसाठी महिला क्रिकेट नकाशावर ठेवल्याबद्दल धन्यवाद!’

https://www.instagram.com/p/CfACym1IkpJ/

मिताली राज ही महिला क्रिकेटची उत्तम खेळाडू आहे. तिने चार विश्वचषकांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. मिताली राजने नुकतीच सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडेच मितालीने न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!