Share

राष्ट्रवादीला धडा शिकवण्याची शिवसेनेकडे संधी, ‘सोने’ कराल – भाजप आमदार राम सातपुते

Published On: 

मुंबई :  महाविकास आघाडी सरकार काही किमान समान मुद्द्यांच्या आधारावर स्थापन झालं, परंतु महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून नेहमीच केला जातो. विरोधीपक्ष नेते देवेन्द्र फडणवीस पासून ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत सर्वांनीच महाविकास आघाडी सरकारच्या अंतर्गत बेबनाव असल्याचा आरोप केला. फडणवीस यांनी याआधीही महाविकास आघाडी सरकारमध्ये निधी वाटपात दुजाभाव केला जातोय असे म्हंटले होते. राष्ट्रवादीच्या खात्यांना जास्त निधी दिला जातो तर, शिवसेनेला निधी वाटपात दुय्यम स्थान आहे, असे फडणवीस यांनी म्हटले होते. आता भाजपचे आमदार राम सातपुते यांनी देखील निधी वाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सर्वच पक्षाच्या आमदारांना पुरेसा निधी द्यायचे, आज मात्र शिवसेनेला कमी निधी राष्ट्रवादीकडून दिला जातो, त्यामुळे आज विधानपरिषेदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकवण्याची संधी आहे शिवसेनेकडे आहे, असे राम सातपुते यांनी म्हटले आहे.

राम सातपुते यांनी ट्विट करत निधी वाटपाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील निधी वाटपाच्या मुद्द्यावर बोट ठेवले आहे. राम सातपुते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, “शिवसेनेच्या आमदारांनो, राष्ट्रवादीला सडेतोड उत्तर देण्याची हीच ती वेळ. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जनतेच्या हिताला व महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देऊन सर्वच पक्षाच्या आमदारांना पुरेसा निधी द्यायचे. पण यावेळी राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना सर्वात कमी निधी देण्याचं षडयंत्र रचलं. तुम्ही सर्वांनी हिंमतीने नाराजी बोलावून दाखवलीही, पण त्याचा काही उपयोग झाला नाही! त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकवण्याची संधी आज तुमच्याकडे आहे. या संधीचं तुम्ही सर्वांनी सोनं कराल यात शंकाच नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!