जळगाव : गत वर्षीच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी संकटात आहेत. त्यानंतर पुन्हा व्यापाऱ्यांचे ब्रेक दि चेनमुळे कंबरडे मोडले आहे. राज्यात किराणा, भुसार व्यवसाय, बेकरी उत्पादन, फळ विक्री, उद्योग सुरू असताना केवळ खरेदी विक्री करणारा व्यापारी वर्गाचा व्यापार बंद आहे. त्यामुळे व्यवसायिक मालमत्ता करात सूट द्यावी, अशी मागणी भाजप महानगर व्यापारी आघाडीने केली आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलेय. निवदेनात म्हटले आहे की, मागील व चालू वर्षाच्या व्यावसायिक व मालमत्ता करामध्ये सुटचे प्रावधान करावे, लाइट बिल चार्ज माफ करावे, उत्तर प्रदेशात प्रत्येक जीएसटीमधील रजिस्टर व्यापाऱ्यांना दहा लाखांचा दुर्घटना विमा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही रजिस्टर व्यापाऱ्यांना महामारी विमाची घोषणा करून सुरक्षा कवच प्रदान करावे.
बंदच्या कारणांमुळे व्यापारी जीएसटी व टीडीएस रिटर्न कर भरू शकत नाही. व्यापारी वर्गाला आर्थिक दंडापासून वाचवावे, अशी मागणी आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक राठी इत्यादींनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस, जाणून घ्या लस घेण्याची प्रक्रिया
- ‘लस घेतलेल्या वारकऱ्यांना चैत्री वारीसाठी परवानगी द्या’, कीर्तनकार महासंघाची मागणी
- ‘नवाब मलिकांनी आता तरी तोंड काळे करावे’, भाजपच्या अतुल भातकळकरांचे आव्हान
- धक्कादायक! नऊ महिन्यांत महाराष्ट्रात १०२ पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू
- ‘आमदार निधीतील एक कोटी घ्या; पण ऑक्सिजन व रेमडेसिविर द्या’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

