🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर भाजपने मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रा काढून मोदी सरकारच्या सात वर्षांतील कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासह आशीर्वाद मागितले. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची यात्रा सर्वात जास्त वादग्रस्त ठरली. राणेंच्या यात्रेची देशभरात चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. तर राज्यात पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्याला अटक झाल्याचे पाहायला मिळाले.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राणेंना अटक करण्यात आली. तर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून हे प्रकरण आता न्यायालयात आहे. शिवसेनेने रस्त्यावर उतरून राणेंचा निषेध नोंदवला असता यावेळी भाजप-शिवसेनेत राडा झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता शिवसेनेनं भाजपसह राणेंचा वचपा काढला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’वर शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात देवगड पालिकेतील भाजपला रामराम ठोकत दोन नगरसेवकांनी हाती ‘शिवबंधन’ बांधलं आहे. नगरसेविका हर्षदा ठाकूर आणि नगरसेवक विकास कोयंडे असं त्यांचं नाव असून ठाकूर या २०-२५ वर्षे भाजपचं काम करत होते असं वैभव नाईक यांनी सांगितलं आहे. यासह काही सरपंचानी देखील शिवसेनेत प्रवेश केल्याचं समजत आहे. त्यामुळे राणेंसह भाजपला स्थानिक पातळीवर हा मोठा धक्का बसला आहे.
आपलेच नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे आणि फोडले म्हणून उगाच कॉलर वर करून.. आपल्याच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखाला वेड बनवायच..
यालाच म्हणतात "येड्यांची जत्रा" !! @CMOMaharashtra @uddhavthackeray— Nitesh Rane (@NiteshNRane) September 2, 2021
मात्र, आता भाजप आमदार नितेश राणे यांनी या पक्षप्रवेशावर टीकास्त्र सोडत धक्कादायक विधान केलं आहे. ते नगरसेवक शिवसेनेचीच असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांना वेडं बनवल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. ‘आपलेच नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे आणि फोडले म्हणून उगाच कॉलर वर करून.. आपल्याच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखाला वेडं बनवायच..यालाच म्हणतात “येड्यांची जत्रा”!’ असं ट्विट नितेश राणे यांनी करत वैभव नाईक यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ज्या शहरात चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील असतील तिथे ‘अशांतता’ कशी असेल?’
- मराठा आरक्षणातील अडसर दूर होणार ? संभाजीराजेंनी राष्ट्रपतींकडे केल्या ‘या’ २ महत्वाच्या मागण्या
- अजित पवारांनी एवढी जमीन बळकावल्याचा आरोप; उच्च न्यायालयात याचिका दाखल
- ‘…म्हणजे सीबीआयचा तो अहवाल खरा आहे’; नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट
- ‘गुडमॉर्निंग अण्णा, आमच्यासाठी आंदोलन कधी?’ व्यंगचित्राद्वारे राष्ट्रवादीचा खोचक सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
