Share

अजित पवारांनी एवढी जमीन बळकावल्याचा आरोप; उच्च न्यायालयात याचिका दाखल

Published On: 

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर अनेक आरोप होत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे प्रकरण मिटले नाही तोच आता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. बारामती शहरात जवळपास ३ हजार ४०८ वर्ग मीटर जमीन अनधिकृतपणे बळकावल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आली आहे.

निर्धारित नियमांचे पालन न करता अजित पवार यांच्यावर सदर जमीन ही ९९ वर्षाच्या लीजवर आपल्या जवळच्या नगरसेवकाच्या ट्रस्टला देण्याचा आरोप अजित पवारांवर करण्यात आला आहे. ही जमीन गतीमंद मुलांच्या शाळेसाठी आरक्षित आहे. मात्र, त्या जमिनीवर थिएटर बनवण्याचा घाट घातला जात असल्याचं कळतंय. या प्रकरणात लवकरच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईत ९ मजली इमारत बांधली आहे. या इमारतीत संपूर्ण भुजबळ कुटुंब राहत आहे. मात्र, कागदावर परवेज कन्स्ट्रक्सशनची मालकी दाखवली आहे. त्यामुळे भुजबळांनी या परवेजशी आणि इमारतीशी काय संबंध आहे हे स्पष्ट करावं, या परवेजला भुजबळ राहण्याचं भाडं देतात का? की त्यांच्याकडून ही इमारत विकत घेतली आहे, याचा खुलासाही भुजबळ यांनी करावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!