Share

Nitesh Rane : नारायण राणेंना शिवसेना सोडल्यानंतर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, नितेश राणेंचा मोठा खुलासा

Published On: 

मुंबई : राणे कुटुंबीय मागील काही दिवसांपासून शिवसेना तसेच ठाकरे कुटुंबीयांवर सातत्याने टीका करत आहे. नितेश राणे हे नेहमीच विरोधकांना ट्विटरच्या माध्यमातून उत्तर देण्यास तयार असतात. आता नितेश राणेंनी एक नवीन ट्विट केले आहे, यामध्ये त्यांनी मोठा खुलासा केला आहे. ज्यावेळी नारायण राणेंनी शिवसेना सोडली होती तेव्हा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या असा खळबळ जनक खुलासा नितेश राणेंनी केला आहे. राणेंच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच त्यांनी आठवीच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनाही डिवचले आहे. माऊ माऊ संपू दे…मग आपण व्याजासह वस्त्रहरण सुरु करु असा उल्लेखही त्यांनी या ट्विटमध्ये केला आहे.

सध्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमाणे ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती. त्यावेळी सध्या सभ्य वाटणाऱ्या पक्षप्रमुखांनी माझ्या वडिलांना मारण्यासाठी अनेक सुपाऱ्या दिल्या होत्या. एकदा म्याँव म्यांव संपूदे त्यानंतर आम्ही योग्य प्रकारे वस्त्रहरण करू, त्याचबरोबर सहव्याज परफेड करू असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

या अगोदरही निलेश राणे त्यांच्या टीकात्मक ट्विट साठी प्रसिद्ध राहिले आहेत. राणे कुटुंबीयांबाबत कोणी काही बोलले की लगेच निलेश राणेंचे टीकास्त्र सुरू होते. ते मागील काही दिवसांपासून शिवसेनेवर कडाडून टीका करत आहेत. त्यांनी याअगोदरही शिवसेनेला आता वर डोके काढू द्यायचे नाही, अशा आशयाचे ट्विट केले होते. ‘देव धर्मातून एक गोष्ट शिकलो, शत्रूला कधीही डोकं वर काढायची संधी द्यायची नसते. कंसाला मारायला कृष्णाला आणि रावणाला मारायला रामाला पुढाकार घ्यावा लागला. बगळा किती ही साधा दिसला तरी पण तो पाण्यात शिकार करायला उभा असतो, ठाकरेंच्या सेनेला डोकं वर काढायची संधी देऊ नका.’ अशी टीका निलेश राणेंनी शिवसेनेवर केली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!