Share

कल्याण डोंबिवली निवडणुकीवरून भाजप आमदार गणपत गायकवाड यांची शिवसेनेवर टीका

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांवरून वातावरण चांगलच तापलं आहे. मार्च महिन्यात पुणे- मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिकांच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ज्या १० शहरात महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्यापैकी एक म्हणजे कल्याण -डोंबिवली महानगरपालिका होय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर सध्या शिवसेनेची सत्ता आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक पुढच्या महिन्यातच होत असून, त्या आधीच वातावरण तापले आहे. राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षाचा नेहमीच महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर प्रभाव पडत असतो. असाच काहीसा प्रकार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबाबतीत घडला आहे. शिवसेनेनी स्वतःला अनुकूल अशी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रभाग रचना केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे. शिवसेनेनी स्वतःला अनुकूल अशी प्रभाग रचना केली असून ती अत्यंत चुकीची असून काही प्रभागातून मतदारांची नाव पण गायब झाली आहेत असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.

शिवसेनेला आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक सोप्पी जावी म्हणून एकूण ८ प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने आखल्या असून cकेचा काही भाग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट केल्याचा आरोप गणपत गायकवाड यांनी केला आहे. शिवसेनेला जास्तीत जास्त कसे मतदान होईल याची शिवसेनेने खात्री केली आहे असाही आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!