मुंबई : रशियाचे अध्यक्ष वालदमीर पुतीन यांनी युक्रेन देशाविरुद्व आक्रमक पवित्रा घेतला आहे. रशियाने युक्रेन देशाच्या सीमेवर लाखोंच सैन्य उभ केलं आहे. त्यामुळे युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये कधीही लष्करी वादावादी सुरु होईल असे चित्र सध्या तयार झाले आहे. रशिया युक्रेन वादाचे जगभरातील शेअर बाजारांवर गंभीर परिणाम झाल्याचे आज दिसून आले.
रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्याच्या बातम्यांमुळे जगभरातील शेअर बाजारात मोठी विक्री होत आहे. त्यामुळे भारतातील शेअर बाजारांवर पण प्रतिकूल परिणाम झाला आहे. आज बीएसई सेन्सेक्स १६०० हून अधिक अंकांनी कोसळला, तर निफ्टी १७ हजारांपर्यंत खाली आला आहे. रशिया युक्रेन वादामुळे नॅशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी देखील ४८० हून अधिक अंकांनी कोसळला आहे. रशिया युक्रेन वादामुळे २०२२ मधील सर्वात मोठी इंट्राडे घसरण आज झाली आहे.
रशिया युक्रेन वादामुळे जागतिक स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पण सध्या वेगाने वाढत आहेत. या शेअर बाजार घसरणीचा आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीचा भारत देशाच्या महागाईवर परिणाम होण्याची शक्यता अर्थतज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- आमदार वैभव नाईक आणि भाजप कार्यकर्त्यांमधे राडा
- शिवजयंती बाबत मुख्यमंत्र्यांचे नवीन निर्देश
- आदित्य ठाकरेंनी पाळला शब्द; ‘निर्णय’ घेताच ग्रामस्थांनी वाजवल्या टाळ्या
- निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर जुमला ??, चीनच्या ५४ अॅपवर भारत सरकारची बंदी
- रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वे लवकरच भत्ता वाढवणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
