🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बडे उद्योगपती सार्वजनिक तसेच खाजगी बँकांना फसवून परदेशात पलायन करण्यास यशस्वी झाले आहेत. या बँक फसवणुकीवरून केंद्रातील भारतीय जनता पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात अनेक आरोप- प्रत्यारोप झाले आहेत आणि होत आहेत. नुकताच देशात अजून एक बँक घोटाळा समोर आला आहे. यावरून काँग्रेसने केंद्रातील भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. एबीजी शिपयार्डच्या (ABG Shipyard) कथित बँक फसवणुकीवरुन काँग्रेसने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर या घोटाळ्यावरून टीका केली आहे. मोदी यांच्याच संमतीने एबीजी शिपयार्डचा 22,884 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. याला प्रत्युत्तर देताना आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज एक वक्तव्य केले आहे. एजीबी शिपयार्ड घोटाळ्यावरुन त्यांनी आज काँग्रेसवर निशाणा साधला आहे. निर्मला सीतारामन आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या कि, ” भारतीय जनता पक्ष २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून भारतीय बँकांची परिस्थिती काँग्रेसच्या काळापेक्षा अधिक सुधृढ झाली आहे. पूर्वी भारतीय बँकांना अश्या प्रकारचा घोटाळा शोधून काढण्यासाठी ४ ते ५ वर्ष लागायचे , मात्र भारतीय जनता पक्षाने बँकिंग कायद्यात विशेष सुधारणा केल्यामुळे आता भारतीय बँकांना, बँक घोटाळा शोधण्यास आता सरासरी पेक्षा आता कमी वेळ लागतो आहे. एजीबी शिपयार्डचे बँक खाते भारतीय जनता पक्षाच्या वेळी नाहीतर काँग्रेसच्या कार्यकाळात एनपीएमध्ये परावर्तित करण्यात आले होते असे म्हणत निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
अलीकडेच सीबीआयने एबीजी शिपयार्डचे अगरवाल आणि त्यांचे साथीदारांवर २२८४२ रुपयांची बँकांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. या एजीबी शिपयार्ड घोटाळ्यावरून भारतीय जनता पक्ष आणि भारतीय काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चालूच आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- फडणवीसांच्या बंगल्यासमोर भाजप – कॉंग्रेसचे कार्यकर्ते भिडले; अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात
- भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड; हे आहे कारण
- आमदार वैभव नाईक आणि भाजप कार्यकर्त्यांमधे राडा
- आनंद महिंद्रानी केले ‘या’ अनोख्या जुगाडाचे कौतुक, थेट गुंतवणूक करण्याची हमी
- आदित्य ठाकरेंनी पाळला शब्द; ‘निर्णय’ घेताच ग्रामस्थांनी वाजवल्या टाळ्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
