नवी दिल्ली : भारतीय रेल्वे हि देशातील सर्वात मोठी सार्वजनिक सेवा पुरवणारी संस्था आहे. भारतीय रेल्वेत जवळपास १३ लाख पेक्षा जास्त भारतीय काम करतात. आत याच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. यामुळे भारतीय रेल्वेमध्ये काम करणाऱ्या लाखो जणांना फायदा होणार आहे.
नाईट ड्युटी भत्त्याच्या नियमात बदल करण्यात आल्यानंतर ४४ हजार पेक्षा जास्त बेसिक वेतन असणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना नाईट ड्युटी भत्त्याचा लाभ मिळत नव्हता, मात्र या रेल्वे कर्मचाऱ्यांना पण नाईट ड्युटी भत्त्याचा लाभ मिळणार आहे. ४४ हजारांपेक्षा जास्त वेतन असणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना पण ” नाईट ड्युटी भत्ता” मिळावा यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे आणि त्यांनी पण हा प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठवला आहे. यावर अंतिम निर्णय घेण्यात आला तर यामुळे देशातील लाखो रेल्वे कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने भत्त्याबाबतीत घेलेल्या निर्णयामुळे ४४ हजार पेक्षा जास्त वेतन असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना याचा फायदा व्हायचा नाही. त्यामुळे ३ लक्ष पेक्षा जास्त रेल्वे कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला होता.
अत्यावश्यक ट्रेन चालवणार्या चालकांना तसेच देखभाल करणाऱ्या कर्मचार्यांना नाईट ड्युटी भत्ता दिला जातो. या आदेशानंतर ४४ हजार रुपयांपेक्षा अधित बेसिक वेतन असणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन तो पूर्ववत करण्याची जोरदार मागणीही रेल्वे संघटनांनी केली होती, आता त्याला यश येताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर जुमला ??, चीनच्या ५४ अॅपवर भारत सरकारची बंदी
- एक राजा एक जयंती; शिवजयंती १९ फेब्रुवारीलाच साजरी करण्याची विनोद पाटलांची विनंती
- बुलडाण्यात वाईन विक्री विरोधात भाजपच्या महिला आक्रमक
- काँग्रेस नेत्याची भाजप आणि नितीन गडकरींवर टीका करताना जीभ घसरली; म्हणाले…
- IPL AUCTION 2022: पर्दापण सीजनसाठी गुजरात टायटन्सचा असा असेल संघ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

