मुंबई : कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात महाराष्ट्राचे शेतकरीही सामिल झाले आहेत. राज्याच्या २१ जिल्ह्यांचे शेतकऱ्यांनी २३ जानेवारी रोजी दाखल होत २५ जानेवारी रोजी सभा घेऊन व मोर्चा देखील काढला होता. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे देखील आंदोलनात सहभागी झाले होते.
यासोबतच समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी देखील शेतकरी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. शेतकरी आंदोलकांकडून सुरू असलेल्या लढाईचं आणि त्यांनी दाखवलेल्या मनोधैर्याचं कौतुक अबू आझमी यांनी केलं होत. मात्र, त्यावेळी त्यांनी भडकाऊ भाषण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अबू आझमी सारख्या बेजबाबदारपणे वक्तव्य करणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे.
‘काल (२६ जानेवारी) दिल्लीमध्ये आंदोलकांनी केलेल्या नासधुसीचे कनेक्शन परवा (२५ जानेवारी) आझाद मैदानावरील झालेल्या भाषणांशी आहे की नाही, याची चौकशी करण्याची मागणी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.अबू आझमी यांनी कृषी कायद्यावर बोलण्यापेक्षा अत्यंत चिथाऊखोर भाषण केले. नरेंद्र मोदी तेरी राख हो जायेगी, घर घर से बाहर निकलो. अशा आशयाचे भाषण करणाऱ्या अबू आझमी यांचा बोलावता धनी कोण आहे. व्यासपीठावर बसलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आहेत का? की आणखी बाहेरील लोक आहेत? याचीही चौकशी करण्यात यावी’. असे अतुल भातखळकर यांनी म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाभारताचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र
- मुंबई लोकल २९ जानेवारी किंवा १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची शक्यता – महापौर
- प्रजासत्ताक दिनी ‘महाराष्ट्र देशा’च्या औरंगाबाद कार्यालयाचे शानदार उद्घाटन
- शिवसेनेचा भाजपला आणखी एक धक्का; भाजपच्या माजी सचिवाने मातोश्रीत बांधलं शिवबंधन !
- आता सरकार आंदोलकांशी चर्चा करणार का ? जावडेकर स्पष्टपणे म्हणाले….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

