🕒 1 min read
मुंबई : उत्तर प्रदेश एटीएसने काही दिवसांपूर्वी धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. एटीएसने कारवाई करत दोघांना अटक केली होती. त्यानंतर या रॅकेटचे धागेदोरे राज्यातील बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएस पथकाने सोमवारी बीड जिल्ह्यातील मन्नू यादव, अब्दुल इरफान शेख आणि राहुल भोला यांना अटक केली. या अटकेनंतर खळबळ उडाली असून, भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
उत्तर प्रदेशात धर्मांतरण रॅकेटसाठी ७ पद्धतीचे कोड वापरण्यात येत होते. हे सर्व कोड डिकोड करून त्याचा अर्थ उलगडला आहे. देशभरात केल्या जात असलेल्या धर्मांतर रॅकेटचा हे दोघे भाग असल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला होता. या रॅकेटचे धागेदोरे राज्यातील बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
उत्तर प्रदेशातील धर्मांतराच्या षडयंत्रात सहभागी असल्याच्या आरोपावरून उप्र पोलिसांनी बीडच्या एका युवकाला अटक केली आहे. त्याचे लागेबांधे निश्चितच महाराष्ट्रात खोलवर पसरलेले असणार. ठाकरे सरकारने ही पाळेमुळे खणून काढावीत. जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का? pic.twitter.com/mCZv46tQhY
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 29, 2021
‘उत्तर प्रदेशातील धर्मांतराच्या षडयंत्रात सहभागी असल्याच्या आरोपावरून उप्र पोलिसांनी बीडच्या एका युवकाला अटक केली आहे. त्याचे लागेबांधे निश्चितच महाराष्ट्रात खोलवर पसरलेले असणार. ठाकरे सरकारने ही पाळेमुळे खणून काढावीत. जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?’ असा सवाल भातखळकर यांनी केलाय.
काय आहे प्रकरण ?
उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएसने मूळ दिल्लीतील रहिवाशी असणाऱ्या मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम यांना अटक केली होती. बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली होती. मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम हे दोघे दक्षिण दिल्लीतील जामिया नगर भागात राहत होते. मूकबधिर मुलं आणि महिलांचं धर्मांतर केल्यांच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग असून, १ हजारांपेक्षा जास्त लोकांचं त्यांनी धर्मांतर केलं असल्याचं उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटलं होतं. तपासादरम्यान आरोपींना पाकिस्तानमधील आयएसआय तसंच इतर परदेशा संस्थांकडून पैसा पुरवला जात असल्याचं स्पष्ट झालं आहे, असा दावाही पोलिसांनी केला होता. या कारवाईनंतर आता बीडमधून तरुणाला अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अण्णा पुन्हा दिसणार; ‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिका लवकरच येणार भेटीला
- आपल्या वैचारिक परंपरेशी प्रामाणिक न राहणारा पक्ष राजकारणात टिकू शकेल का ?
- अक्षय कुमार दिसणार पुन्हा एकदा खाकीत! साऊथच्या ‘या’ रिमेकमध्ये झळकणार
- प्रिया मराठे बनली गृहिणी! बनवला ‘हा’ खास पदार्थ
- ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची कमावणाऱ्या खेळाडुना मणिपुर सरकारकडुन कोट्यावधींची बक्षिसे जाहिर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
