🕒 1 min read
मुंबई : आगामी जुलै महिन्यात जापानमध्ये टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेत पदकांची कमाई करण्यासाठी सर्व भारतीय खेळाडूंनी कंबर कसली आहे. सर्व खेळाडू स्पर्धेच्या तयारीला लागले आहे.
याच स्पर्धेच्या पार्श्वभूमिवर मणिपुर सरकारने ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडुंना कोट्यावधी रुपयांची बक्षिसे जाहिर करण्यात आली आहे. या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या खेळाडुला 1.2 कोटी, तर रौप्यपदक पटकावणाऱ्या खेळाडूंना 1 कोटी आणि कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडुंना 75 लाख रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. मणिपुरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी ही घोषणा केली आहे.
तसेच मणिपुर राज्यातुन ऑलिम्पिक स्पर्धेत राज्यातर्फे देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पाच खेळाडुंना 25 लाख रुपये दिले जाणार आहे.
Launched the Tokyo Olympic #Cheer4India campaign in Manipur too as a way of cheering the athletes representing India. We are initiating activities like Olympic Quiz, fan engagement drives, Olympic Symposium and also setting up selfie points to click pictures & show their support. pic.twitter.com/sfzYtbBMmL
— N. Biren Singh (@NBirenSingh) June 28, 2021
त्यांच्याव्यतिरीक्त तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनीही ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूला 3 कोटी रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा केली होती. तसेच रौप्यपदकासाठी 2 कोटी आणि कांस्यपदक कमावणाऱ्या खेळाडूंना 1 कोटी अशी घोषणा केली आहे. आता या राज्यातील खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या
- यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध कायम ! वाचा राज्य सरकारची नियमावली
- कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह मिटवण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी करत आहेत धडपड
- बारामतीच्या लता करे आजींना सोनू कक्करने दिली आर्थिक मदत
- अखेर तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना प्रत्यक्षात मदत मिळणार; राज्य सरकारच्या निधीस मंजुरी
- कोरोना लसीकरण केलं नसेल तर पगारावर येणार गदा; लसीकरणवाढीसाठी आयुक्तांची नामी शक्कल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
