🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री प्रिया मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर ती नेहमी तिचे फोटो आणि व्हीडीओ शेअर करत असते. नुकताच प्रियाने एक व्हीडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
प्रियाने शेअर केलेल्या व्हीडीओमध्ये ती अनेकांना आवडेल असा एका पदार्थ बनवत आल्याचे दिसत आहे. ती साउथ इंडियन डोसा करत असून हे पाहून सर्वांच्याचं तोंडाला पाणी सुटलं आहे. यावर चाहते कमेंट्स करून प्रियाचं कौतुक करत आहेत. तसेच तिला एक गृहिणी म्हणून पाहून अनेकांना तीचे कौतुक वाटले आहे.
https://www.instagram.com/p/CQsN9GIAGwv/?utm_source=ig_embed&ig_rid=ccb5491d-6b09-4e6d-8354-fa82c32b986f
प्रिया सध्या सोनी मराठीवरील ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या ऐतिहासिक मालिकेत ‘रायबागन’ ही महत्वाची भूमिका साकारत आहे. मालिकेच्या निमित्ताने प्रिया घोडसवारी आणि तलवारबाजी करताना दिसून येते. या मालिकेसाठी प्रियाने खुपचं मेहनत घेतली आहे. त्यामुळे प्रियाचं या भूमिकेसाठी चाहत्यांकडून कौतुक होतं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा अधिक धोका – WHO
- ‘मला शरद पवारांना भेटायला आवडतं’; पवारांच्या भेटींबाबत संजय राऊतांच भाष्य
- ‘माझं वय ७२ वर्ष, आजही चौकशीला हजर राहू शकत नाही’; अनिल देशमुखांच ईडीला पत्र
- पुण्याच्या प्रश्नावर आयोजित केलेल्या बैठकीला महापौरांनाच न बोलावणे हे अनाकलनीय आहे
- ‘अनिल देशमुखांना आता कोरोना आठवतो? पैसे खाल्ले तेव्हा नव्हता का कोरोना?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
