मुंबई: झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका ‘रात्रीस खेळ चाले भाग ३’ मधील मुख्य भूमिका साकारणारे ‘अण्णा नाईक’ परत येणार, याची चर्चा चांगलीच रंगली आहे. या कार्यक्रमाचे आधीचे दोन भाग देखील लोकप्रिय ठरले होते. त्यामुळे प्रत्येकजण अण्णांची आतुरतेने वाट बघत होता. पहिल्याच भागात अण्णांचा नेहमीचा दरारा पुन्हा अनुभवायला मिळाला आहे. ‘रात्रीस खेळ चाले 2’मध्ये अण्णा, माई, शेवंता या पात्रांनी अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.
तसेच शेवंता हे पात्र देखील कमी काळात खूप लोकप्रिय झाले होते. मात्र लॉकडाऊनमुळे मालिकेचं शुटींग बंद करावं लागलं होतं. मात्र आता या मालिकेच्या चाह्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ते म्हणजे आता पुन्हा एकदा मालिकेचं शुटींग सुरु होणार आहे आणि लवकरच नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रल्हाद कुरतडकर म्हटले की, या मालिकेच्या तिसऱ्या भागात अनेक नवे बदल आहेत. मालिकेत काही वर्षाचं अंतर दाखवण्यात आल्याने अनेक बदलसुद्धा दिसून येत आहेत. या भागात अनेक रहस्यसुद्धा आहेत. त्यांचा उलघडा हळूहळू होतं आहे.
पुढे ते म्हणाले, मालिकेत सध्या अण्णा आणि शेवंता भूत म्हणून वावरत आहेत. त्यामुळे अजूनही नवे ट्वीस्ट पाहायला मिळणार आहेत. त्यामुळेच लवकरात लवकर मालिकेचं शुटींग सुरु करण्यात येणार आहे. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. आणि त्यामुळेच कोकणात प्रचंड पाऊस सुरु आहे. तरीसुद्धा आम्ही या मालिकेचं शुटींग सुरु करणार आहे. त्यामुळे मालिकेत पुढे नेमकं काय घडणार हि उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची कमावणाऱ्या खेळाडुना मणिपुर सरकारकडुन कोट्यावधींची बक्षिसे जाहिर
- यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध कायम ! वाचा राज्य सरकारची नियमावली
- कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह मिटवण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी करत आहेत धडपड
- बारामतीच्या लता करे आजींना सोनू कक्करने दिली आर्थिक मदत
- अखेर तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना प्रत्यक्षात मदत मिळणार; राज्य सरकारच्या निधीस मंजुरी


