🕒 1 min read
मुंबई : बॉलीवुडचा खिलाडी म्हणून अक्षय कुमारला ओळखतात. अक्षय त्याच्या चित्रपटाचे चित्रीकरण वेगात संपवण्यासाठी ओळखला जातो. दरवर्षी जिथे इतर कलाकार 1-2 चित्रपटाची घोषणा करतात तर तिथे अक्षय 3-4 चित्रपटाची सहज घोषणा करतो.
मागील काही दिवसापासुन त्याने कोणत्याही चित्रपटाची घोषणा केली नाहीये. मात्र नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अक्षय कुमार हा तमिळमध्ये आलेल्या ‘रत्सासन’ या चित्रपटाच्या रिमेक मध्ये झळकणार अशी चर्चा सुरु आहे. या रिमेकमध्ये तो मुळ चित्रपटातील अभिनेता विष्णु विशालने साकारलेले पोलिस अधिकाऱ्याचे पात्र साकारणार आहे. तर अभिनेत्री अमाला पॉलचे पात्र रकुल प्रित सिंह ही साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे रणजीत तिवारी हे करतील. रणजीत तिवारी यांनी यापुर्वी अक्षय कुमारचा बेल बॉटमचे दिग्दर्शन केले आहे.
https://twitter.com/SumitkadeI/status/1409774741997588497
या चित्रपटाची कथा ही एका सिरीयल किलरची शोधकथा आहे. एक गुन्हेगार लहान मुलांची हत्या करतो या गुन्ह्याचा छडा लावण्याचे काम अक्षय कुमारचे पात्र करणार असतो. सद्य स्थितीत अक्षय कुमारचा बेल बॉटम हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. येत्या 27 जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. तर सुर्यवंशी हा 15 ऑगस्ट अथवा दसरा किंवा 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल असे सांगण्यात येत आहे. यादरम्यान त्याचा फिलहाल या गाण्याचा दुसरा भाग उद्या म्हणजे 30 जुन रोजी प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची कमावणाऱ्या खेळाडुना मणिपुर सरकारकडुन कोट्यावधींची बक्षिसे जाहिर
- यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध कायम ! वाचा राज्य सरकारची नियमावली
- कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह मिटवण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी करत आहेत धडपड
- बारामतीच्या लता करे आजींना सोनू कक्करने दिली आर्थिक मदत
- अखेर तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना प्रत्यक्षात मदत मिळणार; राज्य सरकारच्या निधीस मंजुरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
