औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगायला हवे होते. राजीनामा घेण्याऐवजी साधी प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केली नाही. यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने सोमवारी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आ. अतुल सावे, विजया रहाटकर, संजय केनेकर, अमृता पालोदकर, राजेश मेहता यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक न्याय या सारखे मंत्रीपद भूषविणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या महिलेशी असलेल्या संबंधांची कबुली दिली आहे. पहिल्या पत्नीच्या संमतीनेच आपण महिलेशी संबंध ठेवले आपले नाव दिले, याची कबुलीही मुंडे यांनी दिली आहे. मंत्रीपदावरील व्यक्ती अशा पद्धतीचे वर्तन करत असले तर तिच्यापासून झालेल्या मुलांना त्यातून समाजाला काय संदेश जातो आहे. याचा विचार करावाच लागणार आहे. मुंडे यांच्या विरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धडपड महिला करत आहे. मुंडे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांचे स्वरूप पाहता, या आरोपांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांचा राजीनामा घेणे आवश्यक होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही, त्यामुळे महिला मोर्चाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे, असे आंदोलक महिलांनी सांगितले.
एकीकडे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती सारखा कायदा आपण करतो. मात्र दुसरीकडे राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांवर महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार करत आहे. या तक्रारीची कोणत्याही दबावाखाली चौकशी होऊ नये याचीही मुख्यमंत्र्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; गावातील पराभवानंतर चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया
- राणेंना धक्का देणारा अजुन जन्माला आलेला नाही, ना पुढे येणार – नितेश राणे
- घासून नाय, तर विरोधकांची ठासून !, काकोळी ग्रामपंचायतवर फडकला मनसेचा झेंडा
- भाजपच नंबर एकचा पक्ष ठरेल; भाजपचे प्रवक्ते उपाध्येंचा दावा
- पवारांकडून मुंडेंना अभय; ठाकरेंनी निर्णय घेणं महत्त्वाचे – प्रकाश आंबेडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
