मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध रेणू शर्मा यांनी अत्याचाराचा गंभीर आरोप केला आहे. रेणू शर्मा यांनी ओशिवारा पोलीस ठाण्यात १४ तारखेला आपली तक्रार नोंदवली होती. मात्र अद्यापही पोलिसांकडून कुठलीही कारवाई केली गेलेली नाही. तर दुसरीकडे पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही धनंजय मुंडे यांची पाठराखण केलेली आहे. राष्ट्रवादीच्या इतरही नेत्यांनी मुंडेंना ब्लॅकमेल केल जात असल्याचं मत व्यक्त करत रेणू शर्मा यांच्या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
यावर भारतीय जनता पक्ष आक्रमक झालेला दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून शरद पवार हे धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला होता. मुंडे यांनी नैतिकता म्हणून राजीनामा नाही दिला तर, सोमवार पासून आम्ही राज्यभर आंदोलने करू असा इशाराही दिला होता. चंद्रकांत पाटील बोलले त्याप्रमाणे, भारतीय जनता पक्षाकडून आज राज्यभर आंदोलने सुरु झाली आहेत.
यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर लावलेल्या आरोपांवर काहीही न बोलता, त्यांनी मुंडे बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच निर्णय घ्यावा असे मत व्यक्त केले आहे. ‘ज्या दिवशी शरद पवार हे प्रकरण गंभीर आहे असे म्हणाले, त्याच दिवशी लोकांच्या लक्षात आले की धनंजय मुंडे यांना अभय मिळणार. या प्रकरणावर इतर पक्षांनी भूमिका घेऊन फार परिणाम होणार नाही,’ असे म्हणत धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध आक्रमक झालेल्या विरोधकांना प्रकाश आंबेडकर यांनी टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- युपीत लव्ह जिहादचा तमाशा : नसिरुद्दीन शाह
- कोरोना महामारीमुळे मी पत्नीचं चुंबनही घेऊ शकलो नाही; फारुख अब्दुल्लांची व्यथा
- बॅटिंगदरम्यान ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मला डिवचत होते, शार्दूल ठाकूर म्हणाला…
- राज ठाकरे म्हणाले ताकदीने लढा, पण मनसेचे इंजिन सुरूच झालं नाही
- ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुरस्काराने महाराष्ट्र केसरी बालारफि शेखचा गौरव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
