Share

राज ठाकरेंचा ‘हिंदुहृदयसम्राट’ उल्लेख; मुंबईत मनसेची बॅनरबाजी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ‘हिंदुहृदयसम्राट’ असा उल्लेख करण्यात आलेले बॅनर सध्या मुंबईतील घाटकोपर येथे दिसून येत आहे. (Raj Thackeray mentioned on the banner Hindu Heart Emperor) त्यामुळे राज्यातील राजकारणात सध्या याचीच चर्चा सुरु असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान २०२२ साली राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली होती. त्यावेळी ठाण्यातील मनसेच्या कार्यालयाबाहेर बॅनरवर तसेच सोशल मीडियावरही अनेक पोस्टमध्ये राज ठाकरेंचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट असा करण्यात येत होता. यावरुन शिवसेनेने मनसेवर टीका केली होती. नाव घेतल्याने कोणी हिंदूह्रदयसम्राट होत नाही आणि हिंदूंची मत देखील मिळत नाही असा टोला शिवसेनेनं मनसेला लगावला होता.

त्यावेळी राज ठाकरे यांनी मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा आहे. मी बाळासाहेबांइतका मोठा नाही. असे म्हटले होते. आता पुन्हा एकदा मनसेच्या बॅनरवर राज ठाकरे यांचा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणून करण्यात आला आहे. याचे बॅनर सध्या मुंबईत झळकत आहेत. त्यामुळे आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार असल्याचे चित्र दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!