जळगाव: जागतिक पाणथळ प्रदेश दिनानिमित्त पक्षिमित्रांनी नुकतीच वाघूर धरण परिसरात पक्षी गणना केली आहे. त्यात ६८ प्रजातींच्या ९७२ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. विशेषत: रेषाळ बगळा आणि तपकिरी खाटीक हे हिवाळी पाहुणे म्हणून गणल्या जाणाऱ्या पक्ष्यांची नोंद झाली.