बंगळूरू: IPL 2022 स्पर्धंसाठी नवोदित दोन संघामधील एक गुजरात टायटन्स तयार झाला आहे. मेगा ऑक्शनमधून गुजरात टायटन्सने त्यांच्या संघात एकूण २१ खेळाडूंना खरेदी केले आहे. गुजरात संघाने निवडलेल्या काही प्रमुख खेळाडूंमध्ये मोहम्मद शमी, जेसन रॉय आणि लॉकी फर्ग्युसन हे आहेत. त्यांनी लॉकी फर्गुसनला १० कोटीत खरेदी केले आहे. तो संघातील सर्वात महाग खेळाडू ठरला आहे.
गुजरात टायटन्सने २०२१ च्या ऑक्शनमध्ये ५२ कोटी रुपयांच्या बजेटसह एंट्री केली. संघाने यापूर्वी हार्दिक पांड्या, रशीद खान आणि शुभमन गिल यांना ड्राफ्ट खेळाडू म्हणून निवडले होते. तर पंड्या आणि खान यांना प्रत्येकी १५ कोटीत शुभमन गिलला ८ कोटी दिले. हार्दिक पंड्या गुजरात संघाचा कर्णधार असेल. संघाने दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन यांना संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून निवडले आहे. आशिष नेहराला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
गुजरात टायटन्स संघ: हार्दिक पांड्या, रशीद खान, शुभमन गिल, मोहम्मद शमी, जेसन रॉय, लॉकी फर्ग्युसन, अभिनव सदरंगानी, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, विजय शंकर, जयंत यादव, डॉमिनिक ड्रेक्स, दर्शन नळकांडे, यश दयाल, अलझार, संगदीप जोन, संगदीप जोशी , अशोक शर्मा , डेव्हिड मिलर , वृद्धिमान साहा , मॅथ्यू वेड , वरुण आरोन , बी साई सुदर्शन.
महत्वाच्या बातम्या
- “वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका”; एकनाथ खडसेंची टीका
- देशात प्राथमिक शिक्षण मोफत करण्याची पहिली मागणी सावित्रीबाईंनीच केली- देवेंद्र फडणवीस
- IPL AUCTION 2022: ‘हे’ मोठे खेळाडू आहेत कोलकता नाईट रायडर्सचा संघाचा भाग
- उदयनराजे नेहमीच स्टंटबाजी करून सातारकरांना खोटी स्वप्न दाखवतात ; शिवेंद्रराजेंची खोचक टीका
- ‘स्टंटबाजी करून विकासाची खोटी स्वप्ने दाखवतात’; शिवेंद्रराजे भोसले यांचा उदयनराजेंवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

