Share

‘सत्तेसाठी भाजप नेत्यांची धडपड सुरू’, अशोक चव्हाणांची टीका

Published On: 

परभणी : सत्तेच्या बाहेर राहणे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सहन होत नाही. सत्तेसाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळेच मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचे काम भाजप नेते करत असल्याची टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

परभणी येथे काँग्रेसचे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांच्या निवासस्थानी चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाला अधिकार नसल्यामुळे या प्रकरणात निर्णय घेता येत नाही. हे अधिकार केंद्राकडे असल्याने तेथूनच निर्णय अपेक्षित आहे. राज्यातील सत्ता भाजपच्या हातातून गेल्यामुळे त्यांची सत्तेसाठी धडपड सुरु झाली आहे. त्यामुळे आरक्षण या विषयावर भाजपकडून चुकीच्या पद्धतीने माहिती पसरवली जात आहे.

मराठा आणि ओबीसी यांच्या आरक्षणासंदर्भात केंद्र शासनाला अधिकार आहेत. यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार व मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो होतो. त्यांना आरक्षण देण्यासंदर्भात विनंतीही केली आहे. परंतु त्याबाबत अद्यापही निर्णय झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मराठा आरक्षणाचा कायदा करुन दिशाभूल करण्याचे काम करण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कामे मार्गी लागायला हवी होती ती झाली नाहीत, असाही आरोप अशोक चव्हाण यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!