बेळगाव – कर्नाटकमधील भाजपचे नेते, बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची अश्लील सीडी सार्वजनिक झाली आहे. नोकरीचे आमिष दाखवून त्यांनी एका मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
बेंगलुरू येथील नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कल्लाहल्ली यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. कल्लाहल्ली यांनी सांगितले की मी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलीसोबत हा प्रकार घडला असून काल मंगळवारी हा सगळा प्रकार चर्चेत आला आहे. नोकरी देण्याच्या बदल्यात लैंगिक संबंधांची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
दरम्यान,बेंगळूर पोलीस ठाण्यात प्रथमदर्शनी तक्रार दाखल झाली आहे. त्या युवतीच्या तक्रारी नंतर योग्य ती चौकशी करून एफआयआर दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.पोलीस उपायुक्त एम. एन. अनुचेथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस सध्या मिळालेल्या तक्रारीमध्ये किती सत्यता आहे हे तपासून पाहत आहे.
दुसऱ्या बाजूला भाजप हाय कमांडने सेक्स सीडीप्रकरणी त्यांना राजीनामा देण्याची सूचना केली आहे. एक केंद्रशासित प्रदेश आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पेचप्रसंगापासून वाचण्यासाठी सीएम बीएस येडीयुरप्पा यांनी लवकरच रमेश जारकीहोळी यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रमेश यांच्यावर आरोप करण्यात येत आहे त्यांनाही यासंदर्भात कोणतही भाष्य केलेले नाही. रमेश यांनी आपला फोन बंद ठेवला आहे. ६० वर्षीय रमेश हे सत्तेत असणाऱ्या भाजपाच्या येडियुरप्पा सरकारमधील महत्वाचे मंत्री आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- सोनपेठ येथील क्रीडा संकुलासाठी सर्वोतोपरी मदत करणार; क्रीडा मंत्र्यांचे आश्वासन
- मिटकरी भावा तू आता आला,माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार
- अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संजय राठोड पुन्हा मंत्रीमंडळात येणार ?
- राज्य सरकार डॉक्टरांचा सल्ला घेतंय की कंपाऊंडरचा ? फडणवीस कडाडले
- माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची ‘बैलगाडी’ रोखली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

