Share

“भाजपातील नेत्यांना भूताटकीने झपाटले आहे”, संजय राऊतांचा खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर निशाणा साधला आहे. आज भाजप नेते किरीट सोमय्या कोर्लई गावात जाणार आहेत. कोर्लई गावात मुख्यमंत्री ठाकरे यांचे १९ बंगले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावरच शिवसेनेने आव्हान देता, आज सोमय्या कोर्लई गावात जनतेला वास्तव कळावे, यासाठी निघाले आहे. त्यावरच प्रतिक्रिया देताना संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी भाजपला निशाण्यावर धरले आहे.

यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कोर्लई येथील जमिनीवर एकही बांधकाम, बंगला नाही. सोमय्या यांना स्वप्नात बंगले दिसत आहेत. भाजपाच्या लोकांना बहुतेक भुताटकीने झपाटलं आहे. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच त्या जागेचे मूळ मालक अन्वय नाईक आहेत. अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली यासंबंधी हे लोक बोलत नाहीत. पण अन्वय नाईक यांना ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली त्या गुन्हेगाराच्या समर्थनार्थ हे सगळे लोक कोर्टबाज्या, पत्रकबाज्या करत होते, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांचा देशातील सर्वात मोठा चोर, लफंगा, डाकू असा उल्लेख केला आहे. तसेच भाजपचे लोक महाराष्ट्र आणि मुंईबतून मराठी उद्योजकांना संपवण्याचा प्रयत्न करत असून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्व अन्वय नाईकचे हत्यारे असून आणि त्यांच्यातील एक हत्यारा त्या जमिनीवर चालला आहे. असे म्हणत सोमय्याअन्वय नाईक यांच्या आत्महत्या करण्यास कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!