मुंबई: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Former Prime Minister Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना चांगलेच सुनावले आहे. पंजाबमधील ११७ जागांसाठी रविवारी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी चित्रफीत प्रसिद्ध करत मतदारांना अप्रत्यक्षपणे संदेश दिला आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारचा राष्ट्रवाद बनावट आणि पोकळ असल्याचे म्हटले. तर यावरच आता भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत प्रतिउत्तर दिले आहे.
“डॉ. मनमोहन सिंह यांच्या पक्षाचा राष्ट्रवाद देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क अल्पसंख्याकाना बहाल करणारा, आणि हिंदूंना दहशतवादी ठरवणारा होता, म्हणून मतदारांनी काँग्रेसच्या पेकाटात लाथ घातली.”, असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी मनमोहन सिंह यांना प्रत्युत्तर दिले आहे.
डॉ मनमोहन सिंह यांच्या पक्षाचा राष्ट्रवाद देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क अल्पसंख्याकाना बहाल करणारा, आणि हिंदूंना दहशतवादी ठरवणारा होता, म्हणून मतदारांनी काँग्रेसच्या पेकाटात लाथ घातली. pic.twitter.com/ZncaYl3iwi
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 18, 2022
काय म्हणाले होते मनमोहन सिंह?
राजकीय स्वार्थासाठी देशातील नागरिकांना जाती-धर्माच्या नावाखाली, प्रांता-प्रांतात भेद निर्माण करून फूट पाडली जात आहे. लोकांना एकमेकांमध्ये लढवले जात आहे. मोदी सरकारचा राष्ट्रवाद बनावट आणि पोकळ असून धोकादायकही आहे. फोडा आणि राज्य करा, या ब्रिटिश नितीवर भाजपचा ‘राष्ट्रवाद’ टिकलेला आहे. लोकशाहीवर मोदी सरकारचा विश्वास नाहीये. त्यामुळे घटनात्मक संस्था कमकुवत केल्या जात आहेत असा आरोपही मनमोहन सिंह यांनी केला आहे.
तसेच “एकीकडे जनतेला महागाई आणि बेरोजगारीच्या समस्या भेडसावत आहेत, तर दुसरीकडे गेल्या साडेसात वर्षांपासून सत्तेत असलेले विद्यमान सरकार आपल्या चुका मान्य करून त्या सुधारण्याऐवजी पंतप्रधान नेहरूंना दोष देत आहे.”, अशा शब्दांत मनमोहन सिंह यांनी मोदींना सुनावले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “साडेसात वर्षांपासून सत्तेत असलेले मोदी सरकार चुका मान्य न करता नेहरूंना दोष देतात’, मनमोहन सिंग यांनी सुनावले
- “विराट माझ्याजवळ आला आणि मी…” ; सचिन तेंडुलकरचा मोठा खुलासा
- मुंबईत जामीन मिळताच हिंदुस्तानी भाऊला नागपूर पोलिसांनी बजावली नोटीस
- राज्यातील जनतेला वास्तव कळावे म्हणून किरीट सोमय्या आज कोर्लई गावात जाणार
- ‘देवेंद्रजी ३०-३५ पुरणपोळ्या पातेलंभर तुपासोबत खायचे’, अमृता फडणवीसांचा अजब खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

