🕒 1 min read
बंगळुरु : एका पोलीस हवालदाराने कर्नाटकचे भाजप नेते आणि माजी आमदार ए. पापरेड्डी यांना निषेध रॅलीदरम्यान माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पुतळ्याचे दहन करण्यापासून रोखले होते. यामुळे संतापलेल्या माजी आमदारांनी पोलीस हवालदाराला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये, पापरेड्डी यांनी रायचूर पश्चिम पोलीस ठाण्यात तैनात असलेला हवालदार राघवेंद्रला धक्काबुक्की केली आणि थापड मारताना दिसत आहे.
काँग्रेस नेत्याचा पुतळा जाळण्यापासून रोखल्यामुळे भाजप नेत्याने दादागिरी करत पोलीस हवालदाराच्या कानशिलात लगावली आहे. 26 ऑक्टोबर रोजी सिंदगी येथे जाहीर सभेत दलितांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्या विरोधात भाजप अनुसूचित जाती मोर्चाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी निषेधादरम्यान हवालदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
वाद वाढू लागल्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत पापरेड्डी आणि हवालदाराला भांडण्यापासून रोखले. ‘साध्या वेशभूषेतील माणूस पोलीस हवालदार आहे हे मला माहीत नव्हते. मला वाटलं की तो भाजपचा कार्यकर्ता आहे. हवालदाराने पुतळा हिसकावून नाल्यात फेकल्यामुळे मी चिडलो, असं पत्रकारांशी बोलताना पापरेड्डी यांनी सांगितलं आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
दरम्यान, मी माफी का मागू? कॉन्स्टेबलवर कारवाई व्हायला हवी होती. त्याने नम्र असायला पाहिजे. तसेच तो साध्या कपड्यांमध्ये येऊन आमच्यात उभा का राहिला होता, असं माजी आमदार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पेट्रोल-डिझेल दर कपातीवरुन प्रियांका गांधींनी उडवली मोदी सरकारची खिल्ली
- केंद्राप्रमाणे राज्यात 5 व 10 रुपये कपात व्हायलाच हवी पण..; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- केंद्राने पेट्रोल-डिझेल शुल्क कपात केले, आता राज्य सरकारनेही जबाबदारी पार पाडावी – चित्रा वाघ
- ‘राज्य सरकारनेही इंधनावरील कर थोडे कमी करून हातभार लावायला काय हरकत आहे?’
- दिवळीच्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
