मुंबई – प्रत्येक वेळी केंद्रावर टिका करून अथवा प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलून, महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या विकासकामांच्या प्रकल्पापासून राज्य सरकारला लांब पळता येणार नाही. वादातीत जागेवर लिटीगेशन तयार करून काही अडचणी आल्या तर ते केंद्र सरकारवर ढकलून मोकळं होण्याची नियोजनबद्ध चाल मुख्यमंत्री आणि राज्य सरकारची दिसतेय असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
मुंबई मेट्रो प्रकल्पापेक्षा राज्य सरकारला त्यांचा अहंकार आणि प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. त्यामुळेचं वेळोवेळी केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून विषयाला बगल देण्याचा आणि ढकलाढकली करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार करत असल्याची टीकाही दरेकर यांनी यावेळी केली.विनायक मेटे यांनी मातोश्रीच्या बाहेर केलेलं आंदोलन हे प्रामाणिक भावनेतून केलेलं आंदोलन होतं. मुख्यमंत्री भेटत नाहीत, तर स्वतः त्यांच्या दारी जावं आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेमकी काय प्रगती आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रामाणिक आंदोलन होतं असे स्पष्ट केले.
दरेकर म्हणाले की, परंतु मुख्यमंत्री आणि राज्य सरकार या विषयाबाबत संवेदनशील नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना भेटणं आवश्यक होतं. काय करणार आहोत, याबाबत विश्वास देण्याची आवश्यकता होती. परंतु मेटे यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवण्याचं काम सरकारने केलं.केवळ अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. यावेळी ज्या गतीनं अशोक चव्हाणांनी लक्ष दिलं पाहिजे, त्या गतीने लक्ष दिलं जात नाही, याभावनेने विनायक मेटे यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परंतु यामध्ये मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि सरकारची भावना देखील महत्त्वाची आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची घेतलेली भेट राजकीय नाही…ही केवळ सदिच्छा भेट असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोण आला रे कोण आला आरपीआय चा वाघ आला’
- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे देखील मुख्यमंत्र्यांनच्या आवाहनाला समर्थन
- खडसे माघार घ्या, अन्यथा राष्ट्रवादीला याचे परिणाम भोगावे लागतील; ब्राह्मण महासंघाचा इशारा
- न्हावरेतील घटनेचा तपास गांभीर्याने करण्याची आढळराव पाटील यांची मागणी
- दिवाळीत फटाके वाजवण्यासंदर्भात मुंबई महापालिकेची अजब नियमावली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

