Share

अभिनेत्री काजोलला कोरोनाची लागण; सोशल मीडिया पोस्ट करत दिली माहिती

Published On: 

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री काजोलला कोरोनाची लागण झाली (Actress Kajol Corona Positive)आहे. याबाबत तिने सोशल मीडिया पोस्ट करत माहिती दिली आहे. अलीकडच्या काळात बर्‍याच सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. तर, अनेक कलाकार त्यातून लवकर बरेही झाले. आता काजोलला कोरोनाने गाठले आहे.

याबाबत काजोलने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लेक न्यासा देवगणचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये न्यासाच्या हातावर सुंदर मेहंदी दिसत आहे. त्यासोबत काजोलने लिहिले की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि माझे लाल नाक कोणीही पाहू नये, अशी माझी इच्छा आहे. म्हणून आपण जगातील सर्वात गोड हास्य कायम ठेवू. मिस यु न्यासा.’ असे काजोलने म्हटले आहे.

दरम्यान आजच गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर कोरोनामुक्त झाल्या आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र आता अभिनेत्री काजोलची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. दरम्यान कामाबद्दल सांगायचे तर काजोलने रेवती दिग्दर्शित ‘द लास्ट हुर्रे’ हा चित्रपट साईन केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!