Share

“डोळसपणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले”

Published On: 

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.अनिल अवचट(Anil Avchat) यांचे आज(२७ जाने.)वयाच्या ७७ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले असून पुण्यातील राहत्या घरी आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फक्त साहित्यिक नाही तर सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होती. एक पत्रकार म्हणून देखील त्यांनी अनेक विषयांवर आपली मत मांडली. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, अन्य कुटुंबीय असा मोठा मित्रपरिवार आहे. दरम्यान, अनिल अवचट यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार(Sharad Pawar) श्रद्धांजली वाहिली आहे.

यासंदर्भात शरद पवार यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, पत्रकार डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने डोळसपणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून त्यांनी केलेले भरीव कार्य तळागाळातील अनेकांसाठी नव्या आयुष्याची सुरुवात ठरले. शोकाकुल अवचट कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. दिवंगत अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली’, असे पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केली. तसेच आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला होता.अवचट हे स्वतः पत्रकार होते तरी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला त्यांनी नेहमीच नकार दिला. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली. आत्तापर्यंत त्यांची बावीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!