मुंबई: मालाडमधील एका क्रिडा संकुलाला टिपू सुलतान नाव(Veer Tipu Sultan Naming) दिल्याप्रकरणी भाजप नेते राज पुरोहित यांनी पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. तर काल याविरोधात भाजपने आंदोलनही केले. दरम्यान यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत भाजपला सवाल केला आहे.
“टिपू सुलतानचं नाव दिलं म्हणून अस्लम शेख(Guardian Minister Aslam Sheikh) यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजप करत असेल तर भाजपने सर्वात अगोदर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घेतला पाहिजे.(BJP should resign President) राष्ट्रपती कोविंद यांनी कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन टिपू सुलतानचा गौरव केला होता. महान योद्धा, ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्य सैनिक वगैरे वगैरे या उपाध्या राष्ट्रपतींनीच लावल्या आहेत. त्यामुळे सर्वात आधी भाजपने त्यांचा राजीनामा घ्यावा. उगाच इतिहासाची ठेकेदारी घेऊन इथे गडबड करू नका. मुंबईत काय करायचं हे मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation)आणि राज्य सरकार पाहून घेईल. तुम्ही काळजी करू नका”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
तसेच टिपू सुलतानचं काय करायचं ते आम्ही पाहू. आम्हाला इतिहास कळतो. तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाहीत. तुम्ही कशा पद्धतीने इतिहास बदलता, लिहिता, दिल्लीत स्वत:चा इतिहास कसा लिहायला घेतला हे आम्हाला माहीत आहे. टिपू सुलतान, हैदर अली, श्रीरंगपट्टणम, मैसूर राज्य सर्व आम्हाला माहीत आहे. टिपू सुलतानने काय अत्याचार, अन्याय केला, ब्रिटिशांसोबत कसा लढा दिला हे सर्व आम्हाला माहीत आहे. आंदोलन करू, महाराष्ट्र पेटवू ही भाषा तुमच्या तोंडी असेल तर या पेटवापेटवीतील महाराष्ट्रातील एक्सपर्ट कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…तर नोकऱ्यांसाठी ते रस्त्यावर उतरले असते का?”, यूपीतील आंदोलनावरून जितेंद्र आव्हाडांचा योगी सरकारवर निशाणा
- जान्हवी ‘मिस्टर आणि मिसेस माही’ चित्रपटाच्या शुटींगसाठी सज्ज,पहिला फोटो केला शेअर
- “ट्विटरला मोहरा बनू देऊ नका…”, राहुल गांधींचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र
- “ज्या भाजपा नेत्यांनी रस्त्यांना वीर टिपू सुलतानचं नाव दिलं, त्यांचा फडणवीस राजीनामा घेणार का?”
- रोहितच्या कर्णधारपदाचे नवे पर्व सुरू!; वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेसाठी संघाची घोषणा

