मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.अनिल अवचट(Dr. Anil Avchat) यांचे आज(२७ जाने.)वयाच्या ७७ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले असून पुण्यातील राहत्या घरी आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फक्त साहित्यिक नाही तर सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होती. एक पत्रकार म्हणून देखील त्यांनी अनेक विषयांवर आपली मत मांडली. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, अन्य कुटुंबीय असा मोठा मित्रपरिवार आहे. दरम्यान, अनिल अवचट यांना भाजप नेते केशव उपाध्ये(Keshav Upadhye) श्रद्धांजली वाहिली आहे.
यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘डॉ. अनिल अवचट यांच्या रूपाने संवेदनशील लेखक, सामाजिक कार्यकर्ता आपण गमावला आहे. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनाला नवी दिशा देणारे डॉ. अवचट यांनी विपुल लेखन करत विविध समाजघटकांचे प्रश्न माध्यमांद्वारे जगासमोर आणले. कामगार, मजूर, वेश्या, भटक्या- जाती जमाती यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम डॉ. अवचट यांनी समर्थपणे केले. कोंडमारा, वाघ्या मुरळी, माणसं, हमीद, गर्द, आडवे उभे, पुण्याची अपूर्वाई अशा पुस्तकांतून डॉ. अवचट यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे आणि प्रतिभेचे दर्शन घडले’, असे उपाध्ये म्हणाले आहेत.
डॉ. अनिल अवचट यांच्या रूपाने संवेदनशील लेखक, सामाजिक कार्यकर्ता आपण गमावला आहे. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनाला नवी दिशा देणारे डॉ. अवचट यांनी विपुल लेखन करत विविध समाजघटकांचे प्रश्न माध्यमांद्वारे जगासमोर आणले. कामगार, मजूर, वेश्या,
1/2— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 27, 2022
दरम्यान, अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केली. तसेच आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला होता.अवचट हे स्वतः पत्रकार होते तरी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला त्यांनी नेहमीच नकार दिला. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली. आत्तापर्यंत त्यांची बावीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते. डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढे असाच पुढे सुरू राहील,असे मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी शोक संदेशात म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
दुःखद! ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.अनिल अवचट यांचे निधन
-
रोहितच्या कर्णधारपदाचे नवे पर्व सुरू!; वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेसाठी संघाची घोषणा
-
“ज्या भाजपा नेत्यांनी रस्त्यांना वीर टिपू सुलतानचं नाव दिलं, त्यांचा फडणवीस राजीनामा घेणार का?”
-
“ट्विटरला मोहरा बनू देऊ नका…”, राहुल गांधींचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र

