वर्धा : अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने जमीन घोटाळा केल्याच्या आरोपामुळे देशभरात खळबळ उडाली होती. याच मुद्यावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. त्यामुळे भाजप युवा मोर्चाच्या वतीने शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली.
भाजपने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढून निषेध करणार होते. भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकरी जमा झाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाच्या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरवातीला बाचाबाची झाली नंतर याच रुपांतर हाणामारीत झाले.
त्यानंतर यावरून आता जोरदार राजकारण तापायला सुरवात झाली आहे. दरम्यान, या वादावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि मंत्री अनिल परब यांनी भाजपवर टीका केली होती. यावर आता भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी प्रतिउत्तर दिले आहे. आम्ही आंदोलनं करूच. उत्तर देण्याची वाट कसली बघताय?. भाजप आंदोलन करायला आजही घाबरली नाही आणि उद्याही घाबरणार नाही, असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला.
आशिष शेलार आज वर्ध्यामध्ये आले होते. वर्ध्यात पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राम मंदिराच्या मुद्यावरून सेना भवनासमोर झालेल्या गदारोळ वर संजय राऊत आणि अनिल परब यांनी भाजपाला उत्तर देऊ असं वक्तव्य केले होते. यावर शेलार यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतलाय. उत्तर देण्याची वाट कसली बघताय. भाजपा आंदोलन करायला आजही घाबरली नाही आणि उद्याही घाबरणार नाही. मंत्र्यांना अश्या पद्धतीने बोलावं लागत आणि सामान्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहे, याच आत्मपरीक्षण शिवसेनेनं करावं, असा सल्ला शेलार यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीत प्राथमिक शाळा सुरु करण्याची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
- औरंगाबादेत जैविक कचऱ्याची संख्या कमी होईना, संसर्ग निम्म्यावर तरी कचरा तेवढाच!
- महत्त्वाचे! राष्ट्रीय स्तरावरील सरासरीपेक्षा तिप्पट प्रश्न विचारले महाराष्ट्रातील खासदारांनी
- ‘या’ राज्यात आढळला चक्क नदीत कोरोना विषाणू !
- ‘क्राईम पेट्रोल’ मधील दोन अभिनेत्रींना पोलिसांनी केले अटक


