कोल्हापूर: राज्यात सध्या फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलवले होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आता पोलीस घरी जाऊन जबाब घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करत नाही. तर त्याऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली असल्याचा आरोप भाजपने केला. या संदर्भात बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले कि, या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. या प्रकरणात संपूर्ण भारतीय जनता पक्ष फडणवीसांच्या पाठीशी असून उद्या रविवारी प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते त्या नोटिशीची होळी करून निषेध नोंदवणार आहेत.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर त्याची तपशीलवार माहिती असलेला पेनड्राईव्ह फडणवीस यांनी त्याच दिवशी केंद्रीय गृहसचिवांकडे तपासासाठी सादर केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. हा तपास रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले जात आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

