Share

‘भाजप कर्मकांडातच व्यस्त’, मित्रपक्षाकडून भाजपला टोला

Published On: 

औरंगाबाद : महाआघाडीतील तिन्ही घटक पक्ष म्हणजे गुळाला चिकटलेले मुंगळे आहेत. त्यामुळे ते सरकार टिकेल आणि कोणी बाहेर पडणार नाही. हे सरकार त्यांच्या कर्मानेच पडेल. मात्र त्यासाठी भाजप काय प्रयत्न करत आहे हे माहिती नसून भाजप कर्मकांडातच व्यस्त असल्याचा टोला विनायक मेटे यांनी लगावलाय.

औरंगाबाद येथे शिवसंग्राम संघटनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्य कार्यकारणीची बैठक शनिवारी पार पडली. शहरातील तापडिया नाट्य मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाला शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांच्या उपस्थिती होती. यावेळी त्यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपला टोले लगावत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा इशारा दिला.

राज्यातील आगामी सर्व निवडणुका शिवसंग्राम पक्ष लढवणार आहे, अशीही घोषणा विनायक मेटे यांनी केली. भाजपने सन्मानजनक वागणूक दिली, तर युती करू नाहीतर स्वबळावर निवडणूक लढवायची आहे, असेही ते म्हणाले. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक शिवसंग्राम लढवणार आहे. युती होईल न होईल पण दोन आकडी नगरसेवक निवडून आणल्याशिवाय थांबणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!