Share

उदयनराजेंनी काल उदघाटन केलेल्या छत्रपती संभाजी महाराज मार्गाचा फलक अज्ञातांनी फाडला

Published On: 

सातारा : काल भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या पोवई नाका येथील ग्रेडसेप्रेटरचे उदघाटन केले होते. पोवई नाका भागात होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी ग्रेडसेप्रेटर बांधण्यात आला आहे. गेल्या पावणेतीन वर्षांपासून याचं काम सुरु होतं. ग्रेडसेप्रेटरचं काम पूर्ण झालं आहे. मात्र, मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करावयाचे असल्याने याचे उदघाटन रखडले होते.

यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. दरम्यान, शुक्रवारी खासदार उदयनराजे भोसले या ग्रेड सेपरेटरच्या सर्व मार्गिकांची आतून पाहणी करणार असल्याचे सांगितले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणाची मागणी सुरू झाल्यानंतर उदयनराजे यांनी लगेचच पाहणीचे नियोजन करण्याचे आदेश सातारा विकास आघाडीच्या नेत्यांना दिले. त्यानुसार ते आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल झाले. याचवेळी त्यांनी अचानक उदघाटन उरकून घेऊन याचे लोकार्पण देखील केले होते.

या ग्रेडसेप्रेटरच्या एका प्रवेशद्वाराचे श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्यात आले होते. तसा नामफलक देखील लावण्यात आला होता. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक समाजकंटकाने फाडल्याचे शनिवारी सकाळी निदर्शनास आले. यानंतर उदयनराजेंच्या समर्थकांनी एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध केला. दरम्यान, सातारा शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पोलिसांनी लगेचचं घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. नागरिकांनी शांतता राखावी असे आव्हान करण्यात येत आहे. दरम्यान, या समाजकंटकांचा त्वरित शोध घ्यावा अशी मागणी शिवभक्तांनी केली आहे. तर फाडलेला फलक पोलिसांनी हटवला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!