Share

ऍपल आणि हुंदाई एकत्र करणार ई-वाहन निर्मिती

Published On: 

वाशिंगटन: अमेरिकन तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी फोन, टॅब्लेट ते फिटनेस बँड या उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. तर आता ऍपल वाहन क्षेत्रात प्रवेश करत आहे ऍपल 2024 पर्यंत कारचे उत्पादन सुरू करू शकते. ही प्रवासी कार त्याच्या स्वत: च्या प्रगत बॅटरी तंत्रज्ञानावर आधारित असेल.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कंपनी २०१४ पासून प्रोजेक्ट टायटन या नावाने वाहन क्षेत्रात प्रवेश करण्याचे काम करत आहे, जेव्हा कंपनीने आपल्या वाहनाचे डिझाइन तयार केले होते. पण नंतर कंपनीने काही पावले मागे घेतली आणि सॉफ्टवेअरवर आपले लक्ष केंद्रित केले.

त्यांनतर आता ऍपल आणि हुंदाई एकत्र ई-वाहन निर्मिती करणार आहेत यासाठी त्यांच्यात प्राथमिक चर्चा झाली. यामध्ये ई-व्हेईकल आणि बॅटरी बनवण्यासाठी देखील चर्चा करण्यात आली. २०२४ पर्यंत ही कर येण्याची शक्यता असून यावर अद्याप दोन्ही कंपन्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

हुंदाई ने सांगितलं कि, ‘या संदर्भात ऍपल सोबत चर्चा सुरु असून हि चर्चा अद्याप प्रथमिक आहे.’ त्यामुळे याविषयी विस्तृत माहिती मिळू शकलेली नाही. या कंपन्या सोबत बॅटरी विकसित करणार आहेत किंवा हुंडीची सहयोगी कमनी किआ मोटर्स कोर्प च्या अमेरिकेतील कारखान्यात त्यांना विकसित केल जाईल.

या पार्श्वभूमीवर हुंदाई चे शेअर आंतरराष्ट्रीय बाजारात 23.8 % नी वाढले आहेत. तर त्यांचीच हुंडाई मोबिस कंपनीचे शेअर ३० % ने वाढले होते. या वाहन निर्मितीचा परिणाम लगेचच शेअर बाजारावर दिसून आला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!