Share

सातारा : फलक फाडला ही घटना दुर्दैवी; शिवभक्तांनी शांतता राखावी – शंभूराज देसाई

Published On: 

सातारा : काल भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या पोवई नाका येथील ग्रेडसेप्रेटरचे उदघाटन केले होते. पोवई नाका भागात होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी ग्रेडसेप्रेटर बांधण्यात आला आहे. गेल्या पावणेतीन वर्षांपासून याचं काम सुरु होतं. ग्रेडसेप्रेटरचं काम पूर्ण झालं आहे. मात्र, मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करावयाचे असल्याने याचे उदघाटन रखडले होते.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणाची मागणी सुरू झाल्यानंतर उदयनराजे यांनी लगेचच पाहणीचे नियोजन करण्याचे आदेश सातारा विकास आघाडीच्या नेत्यांना दिले. त्यानुसार ते आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल झाले. याचवेळी त्यांनी अचानक उदघाटन उरकून घेऊन याचे लोकार्पण देखील केले होते.

या ग्रेडसेप्रेटरच्या एका प्रवेशद्वाराचे श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्यात आले होते. तसा नामफलक देखील लावण्यात आला होता. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक समाजकंटकाने फाडल्याचे शनिवारी सकाळी निदर्शनास आले. यानंतर उदयनराजेंच्या समर्थकांनी एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध केला. दरम्यान, सातारा शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या घटनेचा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील निषेध केला आहे. विघातक प्रवृत्तींना पोलिसांनी शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देऊन सातारकर जनतेने शांतता राखावी, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. मला हा प्रकार समल्यावर मी तातडीने सर्व पोलिस अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. तसेच अज्ञात व्यक्तीविरूध्द तातडीने गुन्हा दाखल करा, अशा सूचना दिल्या. संबंधित व्यक्तीचा शोध पाेलिस घेतीलच. परंतु अशा विघातक प्रवृत्तींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः आग्रही आहे. शिवप्रेमी जनतेने शांतता राखावी, असं ते म्हणाले आहेत.

उदयनराजेंच्या समर्थकांनी एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध केला. दरम्यान, सातारा शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेच्या निषेधार्ह शिवभक्तांनी मूकमोर्चा देखील काढला.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!