सातारा : काल भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या पोवई नाका येथील ग्रेडसेप्रेटरचे उदघाटन केले होते. पोवई नाका भागात होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी ग्रेडसेप्रेटर बांधण्यात आला आहे. गेल्या पावणेतीन वर्षांपासून याचं काम सुरु होतं. ग्रेडसेप्रेटरचं काम पूर्ण झालं आहे. मात्र, मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करावयाचे असल्याने याचे उदघाटन रखडले होते.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणाची मागणी सुरू झाल्यानंतर उदयनराजे यांनी लगेचच पाहणीचे नियोजन करण्याचे आदेश सातारा विकास आघाडीच्या नेत्यांना दिले. त्यानुसार ते आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल झाले. याचवेळी त्यांनी अचानक उदघाटन उरकून घेऊन याचे लोकार्पण देखील केले होते.
या ग्रेडसेप्रेटरच्या एका प्रवेशद्वाराचे श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्यात आले होते. तसा नामफलक देखील लावण्यात आला होता. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक समाजकंटकाने फाडल्याचे शनिवारी सकाळी निदर्शनास आले. यानंतर उदयनराजेंच्या समर्थकांनी एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध केला. दरम्यान, सातारा शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान ज्या समाजकंटकांनी ग्रेड सेपरेटरमधील छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिलेला फलक फाडला आहे, त्यांचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा. त्यांना कडक शासन करावे अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाविद्यालयेही सुरु होणार ? उदय सामंत यांनी दिली महत्वाची माहिती
- बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला संभाजीनगरवर शिक्कामोर्तब कराच! खैरेंची मागणी
- ‘युतीत होता म्हणून शिवसेनेचा महापौर व्हायचा आता मात्र सगळीकडे भाजपचाच महापौर होणार’
- ‘आजही केली काय…’भारतीचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले
- ‘भंडारा घटनेतल्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबांना दहा लाखांची मदत दया’


