Share

‘भाजप महान पक्ष, तो परग्रहावरील लोकांवरही गुन्हे दाखल करू शकतो’; राऊतांचा भाजपला टोला

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात राजकीय रणकंद सुरु आहे. राणेंना पोलिसांनी अटक देखील केली होती. तर राणेंची अटक ही पोलिसांवर दबाव टाकून करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी राणेंच्या अटकेसंदर्भातील कारवाईची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, आता भाजपने ठिकठिकाणी शिवसेनेविरोधात तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उत्तर प्रदेशामधील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरुन, भाजपने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तर, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातील लिखाणाविरोधात देखील भाजप पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहे.

यावर आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत भाजपची खिल्ली उडवली आहे. ‘भाजप कुणावरही कारवाई करू शकतो. इतका महान पक्ष आहे तो. तो परग्रहावरील लोकांवरही गुन्हे दाखल करेल. त्यांच्या हातात यंत्रणा आहे. ते काही करू शकतात,’ असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!