मुंबई : भारत आणि इंग्लंड दरम्यान कसोटी मालिका सुरु आहे. यादरम्यान पाकिस्तान संघ वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका खेळत होता. भारत आणि इंग्लंड दोन्ही संघातील तिसरा कसोटी सामना सुरु होण्यापुर्वी आयसीसीने कसोटी फलंदाजाची क्रमवारी जाहीर केली.
आयसीसीच्या नव्या क्रमवारीनुसार रिषभ पंतची एका स्थानाने घसरण झाली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने त्याला धक्का देत आठव्या स्थानी ढकलले आहे. फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी केन विलियमसन हा कायम आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली(७७६) आणि रोहित शर्माच्या(७७३) स्थानात काही फरक पडला नाही. दोघेही पाचव्या आणि सहाव्या स्थानी विराजमान आहे. सातव्या स्थानी बाबर आझम ७४९ गुणासह आहे. तर आठव्या स्थानी ७३६ गुणासह रिषभ पंत हा आहे.
तर गोलंदाजी क्रमवारीत जसप्रीत बुमराह अव्वल दहामधून बाहेर पडला आहे. पाकिस्तानचा गोलंदाज शाहिन आफ्रिदीने १० स्थानाची झेप घेत ८व्या स्थानी झेप घेतली आहे. आर अश्विन हा अव्वल दहामध्ये असलेला एकमेव भारतीय गोलंदाज आहे. तर अष्टपैलु खेळाडूंच्या यादीत रविंद्र जडेजा तिसऱ्या आणि आर अश्विन चौथ्या स्थानी कायम आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- १२ आमदारांचा वाद निकाली लागणार? मुख्यमंत्री ठाकरे, अजित पवार आज राज्यपालांच्या भेटीला
- दिल्लीत मोठ्या घडामोडी? नारायण राणेंवरील कारवाईची ‘चाणक्य’ अमित शाह यांच्याकडून दखल
- ‘चाटूगिरीमुळे बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला एवढं का घाबरतायेत’
- रश्मी ठाकरे यांच्या विरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार
- ‘भाजपने आता तरी शहाणे व्हावे’, शिवसेनेचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

