मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सामनाच्या अग्रलेखावरुन शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरत आहेत, असा सवाल करत त्यांनी असंतर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपीतांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल. अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे.
तसेच यावेळी त्यांनी नारायण राणेंवरील सुडाची कारवाई म्हणजे कायद्याची कारवाई असे संबोधता मग पोलिसांना त्यांच्या आई बहिणीवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या घालणाऱ्या वरूण देसाईला अटक का होत नाही? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल. असं सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचे नेहमी मार्मिक शब्दाने पितळ उघड पाडले पण तुम्ही आज त्यांचाच उधोउधो करणे म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार नाही का? असं सवालही त्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान त्यांनी मला बाळासाहेबांच्या सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर करणाऱ्याला हेच विचारयेचे की त्यावेळेस यांची आस्मिता कुणाच्या पायापुढे लोटांगण घालते. असे म्हणत संजय राऊत, कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याची विकृतीला बांध घाला अन्यथा ‘तुमच्या हम करे सो’ कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील अशी जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सलामीवीरांची नाबाद खेळी, पहिल्या दिवसअखेर इंग्लंडकडे ४२ धावांची आघाडी
- बँक कर्मचाऱ्यांना अर्थमंत्री सीतारामन यांचं मोठं गिफ्ट; कुटुंब निवृत्तीवेतनात तब्बल ‘इतकी’ वाढ
- कोरोना काळातील विधवांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’-यशोमती ठाकूर
- भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांमध्ये गुंडाळला; ९ खेळाडू दोन आकडी संख्या न गाठताच माघारी
- कोरोना काळातील विधवांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’-यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

