वाराणसी : महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. भाजपचा गड असलेला नागपूर आणि पुणे पदवीधर मतदार संघात देखील भाजपला धोबीपछाड मिळाला आहे. आता हे चित्र फक्त महाराष्ट्रातच आहे अस नाही. तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात देखील भाजपची पुरती धूळधाण झाली आहे. महाराष्ट्रासह वाराणसी येथेही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. धक्कादायक म्हणजे दोन्ही मतदारसंघ भाजपला गमवावे लागले आहेत. या दोन्ही ठिकाणी समाजवादी पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या एक दशकापासून या दोन्ही मतदारसंघावर भाजपचेच वर्चस्व होते.
शिक्षक मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार आशुतोष सिन्हा हे 25351 मते आणि भाजपचे केदारनाथ सिंह यांना 22685 मते मिळाली आहेत. तत्पूर्वी शुक्रवारी शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार लालबिहारी यादव यांनी अपक्ष उमेदवार प्रमोद मिश्रा यांचा 936 मतांनी पराभव केला आहे. भाजपचा पाठिंबा असलेले उमेदवार आणि विद्यमान आमदार चेतननारायण सिंह हे तिसऱ्या स्थानी फेकले गेले. ही निवडणूक भाजपसाठी खूप महत्त्वाची आहे. 100 सदस्य असलेल्या उत्तर प्रदेश विधान परिषदेत भाजपचे केवळ 19 आमदार आहेत. तर समाजवादी पक्षाकडे 52 आमदार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीच्या उमेदवारासमोर भाजपचा निभाव लागू शकला नाही. भाजपचा दणदणीत पराभव झाला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. नागपूरमधील पराभव हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जाते. ही निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती.
महत्वाच्या बातम्या
- पवारांनी राहुल गांधींबाबत केलेल्या ‘त्या’ व्यक्तव्याकडे वडिलकीचा संदेश म्हणुन पाहावे : राष्ट्रवादी
- मोठी बातमी : शेतकऱ्यांसाठी आता शरद पवार मैदानात ९ डिसेंबरला राष्ट्रपतींना भेटणार
- ‘शेतकरी हे आई वडिलांपेक्षा कमी नाही’ : सोनू सूद
- मतदार नोंदणीतील दुर्लक्ष भाजपला भोवले- देवेंद्र फडणवीस
- शेतकऱ्यांच्या एल्गाराचा आज दहावा दिवस, ८ तारखेचा भारत बंद होणारच…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

