Share

भाजपला इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळाला 74 टक्के निधी, काँग्रेस,राष्ट्रवादी सेनेला किती निधी मिळाला?

Published On: 

नवी दिल्ली : सन 2019-20 या वर्षामध्ये विक्री करण्यात आलेल्या इलेक्टोरल बॉन्डच्या एक तृतीयांश निधीवर भाजपने कब्जा केल्याचं स्पष्ट झालंय. सन 2019-20 या वर्षासाठी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळालेल्या निधीपैकी तब्बल 74 टक्के निधी एकट्या भाजपला मिळाला आहे. तर केवळ 9 टक्के निधी हा काँग्रेसला मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती समोर आली आहे.

भाजप बद्दल बोलायचं गेल्यास इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून मिळणाऱ्या स्वैच्छिक योगदानाचा वाटा २०१७-१८ मधील २१ टक्क्यांवरून २०१९-२० मघ्ये ७४ टक्क्यांवर गेला आहे. बाँडच्या माध्यमातून भाजपा मिळणाऱ्या देणगीत खूप मोठी वाढ झाली आहे. २०१७-१८ मध्ये भाजपाला २०१७-१८ मध्ये स्वैच्छिक योगदान म्हणून मिळालेल्या एकूण ९८९ कोटींपैकी २१० कोटी रुपये आणि २०१९-२० मध्ये ३४२७ कोटींपैकी २५५५ कोटी बॉण्डमधून मिळाले.

दुसरीकडे काँग्रेसला २०१८-१९ मध्ये बाँडच्या माध्यमातून ३८३ कोटी मिळाले होते. २०१९-२० मध्ये काँग्रेसला मिळालेल्या ४६९ पैकी ३१८ कोटी बाँडमधून मिळाले असून एकूण देणगीच्या ६८ टक्के आहेत. याशिवाय २०१९-२० मध्ये बाँडच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २९ कोटी २५ लाख, तृणमूल काँग्रेसला १०० कोटी ४६ लाख, डीएमकेला ४५ कोटी, शिवसेनेला ४१ कोटी, राष्ट्रीय जनता दलाला २.५ कोटी आणि आम आदमी पक्षाला १८ कोटी मिळाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!